Home > News Update > औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलण्याची मागणी म्हणजे,'दुधाची तहान ताकावर'

औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलण्याची मागणी म्हणजे,'दुधाची तहान ताकावर'

औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलण्याची मागणी म्हणजे,दुधाची तहान ताकावर
X

औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या मागणीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र, या मागणीवरून शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचं नाव बदलण्याची मागणी होत असताना औरंगाबादच्या विमानतळाचं नाव बदलण्याची मागणी करत औरंगाबादच नामांतराचा विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोलले जात आहे.

प्रत्यक्षात शिवसेनेने पहिल्यापासून औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे. पण यावेळी राजकीय समीकरण वेगळी आहेत. कारण शिवसेनेच्या या मागणीला विरोध करणारा काँग्रेस पक्ष आज सत्तेत सोबत आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी एकीकडे सत्ता आहे. तर दुसरीकडे औरंगाबादचं नाव बदलून संभाजीरनगर करण्याची मागणी आहे. मात्र, सध्याची काँग्रेसची भूमिका पाहता या दोन्हीपैकी एक गोष्ट पूर्ण होऊ शकते. पण शिवसेनेला दोन्ही हवं आहे.

त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी विमानतळच नाव बदलण्याची केलेली मागणी त्याचा भाग असल्याचं जाणकार सांगतायत. सत्तेत राहायचं असेल तर काँग्रेसचा विरोधाला-विरोध करून चालणार नाही. त्यामुळे औरंगाबाद शहराचं नाव बदलण्याची मागणीला बाजूला ठेवण्यापेक्षा शिवसेनेकडे पर्याय नाही. पण गेल्या तीस वर्षांपासून ज्या मुद्यावरून राजकिय सत्ता भोगली तोही पूर्ण करणे शिवसेनेसाठी महत्वाच आहे.

त्यामुळेच शहराला संभाजीनगर करण्याचा मागणीला बगल देऊन विमानतळला संभाजीनगर करण्याचा मुद्दा शिवसेनेकडून पुढे आणली जात आहे.विशेष म्हणजे याला काँग्रेसचा विरोधही होणार नाही, आणि शिवसेनेला आम्ही संभाजी महाराजांच नाव दिल्याचं सांगता येईल. त्यामुळे शिवसेनेकडून दुधाची तहान ताकावर भागवली जात असल्याच दिसून येत आहे.

भाजपला करता येईल टार्गेट..

औरंगाबाद विमानतळच नाव बदलून संभाजीनगर करण्याचा पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला लिहलं आहे. त्यामुळे आता विमानतळच नाव बदलण्याचा निर्णय केंद्राने घेतलं नाही, तर शिवसेनेला भाजपवर टीका करण्यासाठी जागा मिळेल. ज्याप्रमाणे जिल्ह्याचं नाव बदलण्याच्या मागणीवरून भाजपने शिवसेनेला कैचीत पकडलं आहे, त्याचप्रमाणे शिवसेना सुद्धा आता विमानतळचं नाव बदलण्यावरून भाजपला टार्गेट करणार असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.

Updated : 7 Jan 2021 2:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top