Home > News Update > राज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता वाढली

राज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता वाढली

राज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता वाढली
X

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना हे करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. सध्या ते घरीच क्वारंटाईन असून गेल्या काही दिवसांत ते अनेक बैठकांना हजर असल्याने सध्या प्रशासन व मंत्री मंडळाची चिंता आणखी वाढली आहे.

मुख्य सचिवांसह राज्यातील प्रमुख मंत्रीही सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. यात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा समावेश आहे.

हे सर्वजण सध्या विलगीकरणात आहेत. त्या आधी अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांना लागण झाली होती. त्यावर त्यांनी यशस्वी मात केली.

दरम्यान, काल रात्री मुख्य सचिवांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मुख्य सचिवांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची खबरदारी म्हणून नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात एकजण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने मुख्य सचिवांनी आपलीही चाचणी करून घेतली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

Updated : 28 Sep 2020 11:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top