‘भाजपपासून वेगळे झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही’ – उद्धव ठाकरे

Courtesy : Social Media

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. मुख्यमंत्री होण्यापुर्वी त्यांनी दोन वेळा अयोध्येचा दौरा केला होता.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘भाजप आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही भाजपपासून बाजुला झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही’

असं म्हणत भाजपकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

तसंच यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून राम मंदीराच्या बांधकामासाठी 1 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे.