Home > News Update > 'हे' आहेत मंत्रीमंडळाचे 12 महत्त्वाचे निर्णय

'हे' आहेत मंत्रीमंडळाचे 12 महत्त्वाचे निर्णय

हे आहेत मंत्रीमंडळाचे 12 महत्त्वाचे निर्णय
X

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य़ांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्यातील सलून सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या सह राज्यसरकारने 12 महत्त्वाचे निर्णय घेतले.

1. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यावरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यावरील कर(सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी.

2. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (व्दितीय सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी.

3. रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना सुरू करण्यास मान्यता. फलोत्पादन शेतकऱ्यांना होणार लाभ.

4. हंगाम २०१९-२० मध्ये हमी भावाने खरेदी केलेल्या कापसाचे शेतक-यांचे चुकारा अदा करण्यासाठी बँकांकडून नजरगहाण कर्ज घेण्यास कापूस पणन महासंघाला शासन हमी देण्यास मान्यता.

5. माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण - २०१५ ला नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत देण्यात आली मुदतवाढ.

6. कोविड-१९ च्या पश्चात उद्योग वाढीसाठी राज्य शासनाची गतिमान पाऊले. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची आखणी.

7. राज्याचे बीच शॅक धोरण तयार करण्यास मंजूरी. समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होणार.

8. नागपूर-नागभिड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्याकरिता राज्य शासनाचा सहभाग देण्यास मान्यता.

9. आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ. राज्यातील आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा.

10. एमटीडीसी जमिनीचा खासगीकरणातून विकास करणार

11. गव्हासाठी विकेंद्रीत खरेदी योजना

12. कोस्टल गुजरात बरोबर वीज खरेदी करार मान्यता.

Updated : 25 Jun 2020 2:50 PM GMT
Next Story
Share it
Top