Home > News Update > पुण्यात शिवप्रेमी संघटनेच्या वतीने पुणे बंदची हाक

पुण्यात शिवप्रेमी संघटनेच्या वतीने पुणे बंदची हाक

पुण्यात शिवप्रेमी संघटनेच्या वतीने पुणे बंदची हाक
X

गेल्या काही दिवसांपासून घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य किंवा त्यांच्या कर्तृत्वाची खिल्ली उडवणारे वक्तव्य केलं जात आहे. त्यामुळे सर्व धर्मीय लोकांच्या भावना दुखावल्या जात असून या विरोधात सर्व धर्मीय शिवप्रेमी संघटनेच्या वतीने आज पुणे बंदची हाक देण्यात आलेली आहे. शहरातील डेक्कन परिसरातल्या संभाजी महाराज पुतळ्यापासून या निषेध मोर्चाला सुरुवात झालेली आहे शहरातील महत्त्वाच्या भागातून हा मोर्चा जाणार आहे याकरता पुणे पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. यानंतर अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे बंदमुळे शहरातील वाहतूक मार्गही बदलले आहेत.




छत्रपती शिवाजी महाराजांबाबतत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून टिळक चौकातून लक्ष्मी रोडने उलट मार्गे बेलबाह चौका-डावीकडे वळून शिवाजीरोडने उलट मार्गे जिजामात चौक, लाल महल इथे समाप्त होणार आहे. यामुळे या कालावधीत डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना वाहतूक विभागाच्या हद्दीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल केले जात आहेत.


कोणते रस्ते बंद?

- लक्ष्मी रोड - सोन्या मारूती चौक ते अलका टॉकीज चौक (मोर्चा सुरू झाल्यापासून बेलबाग चौक पास होईपर्यंत)

- शिवाजी रोड - स.गो. बर्वे चौक ( मोर्चा सेवासदन चौक पास झाल्यानंतर मोर्चा संपेपर्यंत)

- बाजीराव रोड - पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक (मोर्चा सेवासदन चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार)

- गणेश रोड - फकडे हौद चौक ते जिजामाता चौक (मोर्चा सेवासदन चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार)

- केळकर रोड - आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (मोर्चा बुधावर चौकातून पास होईपर्यंत)


काय बंद राहणार, काय चालू?

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत असल्याने पुणे जिल्ह्यातील इंधन पंप उद्याही सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप मालकांनी पोलिसांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. अहवालानुसार, किराणा, बेकरी आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा आज सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि नंतर दुपारी 3 वाजेपर्यंत बंद पाळतील. बंद दरम्यान वैद्यकीय दुकाने सुरू राहणार आहेत. तर पुणे बंदला पाठिंबा देण्यासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत.





पुण्यात आज (१३ डिसेंबर) कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. मात्र पुण्यातील रेड लाईट परिसर म्हणून ओळख असलेली बुधवार पेठ बंद नाही. येथील देहविक्री करणाऱ्या महिलांचा व्यवसाय सुरू असला तरीही रोजच्या सारखी ग्राहकांची गर्दी इथे बघायला मिळत नाहीये. पुण्यात आज सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांनी एकत्र येत मुक मोर्चा काढलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आज पुणे बंद आहे. मात्र याचा परिणाम पुण्यातील बुधवार पेठेतील देहविक्री व्यवसायावर झालेला नाही

Updated : 13 Dec 2022 8:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top