Home > News Update > महाराष्ट्रासह मुंबईत लहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार ; देशात १ लाख ६२ हजार गुन्हे

महाराष्ट्रासह मुंबईत लहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार ; देशात १ लाख ६२ हजार गुन्हे

महाराष्ट्रासह मुंबईत लहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार ; देशात १ लाख ६२ हजार गुन्हे
X

Nagpur : लहान मुला-मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस अधिक वाढ होत आहे. यासंदर्भात देशभरात मुला-मुलींवरील १ लाख ६२ हजार गुन्हे दाखल झाले आहे. मुंलावरील अत्याचाराच्या गुन्ह्यात ८.७ टक्के वाढ झाली आहे. दरम्यान देशात सर्वाधिक महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक,दुसऱ्या स्थानावर मध्यप्रदेश असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे.

देशात अल्पवयीन मुला-मुलींवर अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांत सर्वाधिक वाढ ही महाराष्ट्रात झाली आहे. देशभरात आतापर्यंत १ लाख ६२ हजार ४४९ गुन्हे अल्पवयीन मुलांवर दाखल झाले आहेत. राज्यांच्या तूलनेत महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे. महाराष्ट्रात २० हजार ७६२ गुन्हे दाखल असून दुसऱ्या स्थानावर असलेल्या मध्यप्रदेशात २० हजार ४१५ गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेशात १८ हजार ६८२ राजस्थानमध्ये ९ हजार ३७० आणि पाचव्या स्थानावर असलेल्या ओडिशात ८ हजार २४० गुन्हे, उत्तर प्रदेशात ९९९ गुन्हे दाखल आहेत तर केरळ राज्यात ९३० अल्पवयीन मुलींशी गैरकृत्य केल्याचे गुन्हांची नोंद आहे. तेलंगणात ११३ मुलींशी अश्लील चाळे केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलीचा खून केल्याच्या १४ घटना घडल्या असून या प्रकरणात उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर आहे. तब्बल ३७ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यानंतर खून करण्या घटना उघडकीस आल्या आहेत.


प्राणघातक हल्ल्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

१८ वर्षांखालील मुला-मुलींवर प्राणघातक हल्ल्यात आणि खून केल्याच्या गुन्ह्यांमध्ये देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक २४० अल्पवयीन मुला-मुलींचा खून झाल्याची नोंद आहे. तर महाराष्ट्रात १३९ मुलांचे हत्याकांड झाल्याची नोंद आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या मध्यप्रदेशात ११२ मुलांचे हत्याकांड झाल्याचं उघडकीस आले आहे. दरम्यान महाराष्ट्रात सातत्याने गुन्हेगारी वाढत असून लहान मुलांच्याही हत्याकांडात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

राज्याच्या राजधानीत ३ हजार १७४ गुन्हे

राज्याच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत मुलांवर अत्याचारच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. मुंबईत तब्बल ३ हजार १७४ गुन्हे दाखल आहेत तर उपराजधानी नागपूर हे दुसऱ्या स्थानावर आहे. नागपुरात ७६५ गुन्हे दाखल असून नागपुरात २०२१ मध्ये ९३६ गुन्हे दाखल होते. तिसऱ्या स्थानावर पुणे असून पुण्यात ७३२ दाखल आहेत.

Updated : 23 Dec 2023 3:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top