Home > News Update > Maratha Reservation | मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक 'हे' नेते आहेत उपस्थित

Maratha Reservation | मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक 'हे' नेते आहेत उपस्थित

Maratha Reservation | मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक हे नेते आहेत उपस्थित
X

Mumabai - मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सरकारने मराठा समाजाला ४० दिवसात आंदोलन देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतू याकालावधित मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही,. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अन्न-पाणी त्याग पुन्हा करत अमरण उपोषणाला बसले आहे. मनोज जरांगेचा आज उपोषणाचा आठवा दिवस आहे. या दिवसात अनेक जिल्ह्यात मराठा समाजानं मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. या आदोलनाला हिंसक वळण लागल्याने अनेक जिल्ह्यात संचारबंदीही लागू केली होती.

याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री जयंत पाटील, नाना पटोले, सुनील तटकरे, अनिल परब, सुनिल प्रभू, आशिष शेलार, राजेश टोपे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, राजू पाटील, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, डॉ प्रशांत इंगळे, कुमार सुशील, बाळकृष्ण लेंगरे, आदी उपस्थित आहेत. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिक, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

Updated : 1 Nov 2023 6:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top