Home > News Update > मॅक्स महाराष्ट्रच्यावतीनं आज पिंपरी-चिंचवडमध्ये कामगारांच्या प्रश्नांवर 'महामंथन'

मॅक्स महाराष्ट्रच्यावतीनं आज पिंपरी-चिंचवडमध्ये कामगारांच्या प्रश्नांवर 'महामंथन'

मॅक्स महाराष्ट्रच्यावतीनं आज पिंपरी-चिंचवडमध्ये कामगारांच्या प्रश्नांवर महामंथन
X

पिंपरी-चिंचवड – नव्या कामगार कायद्याविषयी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने मॅक्स महाराष्ट्रच्यावतीने आज पिंपरी-चिंचवड इथल्या आचार्य अत्रे सभागृहात शनिवारी (३ जून) सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान ‘कामगारांच्या प्रश्नांवर महामंथन’ या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले, कामगार कायद्याचे अभ्यासक, ज्येष्ठ विधिज्ञ अँड. नितीन कुलकर्णी, स्पर्धा परिक्षा विद्यार्थी संघटनेचे किरण निंभोरे यांच्यासह इतर मान्यवरही चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यभरातून कामगार-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती मॅक्स वुमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी दिली

Updated : 3 Jun 2023 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top