Home > News Update > माढा लोकसभा लढवण्यासंदर्भात महादेव जानकरांची शरद पवारांशी भेट

माढा लोकसभा लढवण्यासंदर्भात महादेव जानकरांची शरद पवारांशी भेट

माढा लोकसभा लढवण्यासंदर्भात महादेव जानकरांची शरद पवारांशी भेट
X

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महादेव जानकरांकडे असा आग्रह केला आहे की, जानकरांनी माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवावी. याच संदर्भात महादेव जानकरांनी आज शरद पवारांची भेटही घेतली आहे. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाबाबात विस्तृत चर्चा झाली.

या बैठकीनंतर महादेव जानकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमच्या मध्ये सकारात्मक चर्चा झाली असून निवडणूकीला अद्याप अवकाश आहे. त्या हिशोबाने आम्ही विचार करत आहोत. महाविकास आघाडीतील जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. त्यामुळे आमच्यामध्ये सध्या केवळ त्यासंबंधी चर्चा झाली असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघात देखील धनगर समाजाचे महत्वाचे मतदान आहे. या दोन्ही मतदारसंघात धनगर समाजाचा विचार करता महादेव जानकरांच्या माध्यमातून शरद पवारांनी मोठी राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. तेथील धनगर मतदानाचा फायदा महाविकास आघाडीला होईल, त्याचबरोबर महादेव जानकर सोबत असतील तर बारामती मतदारसंघात देखील धनगर समाजाच्या मतदानाचा फायदा हा खासदार सुप्रिया सुळेंना होईल, अशी शरद पवारांना अपेक्षा आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकरांना उमेदवारी देण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे.

Updated : 20 March 2024 8:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top