आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

Courtesy: Social Media

राज्यातील जनतेला कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी लढा देणारे राजेश टोपे यांच्या आईचं आज निधन झालं. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते.

आरोग्य मंत्री राजेश टोपे सध्या कोरोनाच्या या संकटात महाराष्ट्रातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा हाताळत आहेत. अशा परिस्थितीत आपण फार काळ आईसोबतही राहू शकत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. महाराष्ट्रातील जनतेचं आरोग्य सरकार म्हणून आमच्यासाठी सर्वतोपरी असल्याच टोपे यांनी म्हटलं होतं. आज त्यांच्या आईचं निधन झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here