Home > News Update > गाईचे दूध कमी झाले; चिंता नको MAFSU हायडॅटिडोसिस किट

गाईचे दूध कमी झाले; चिंता नको MAFSU हायडॅटिडोसिस किट

गाईचे दूध कमी झाले; चिंता नको MAFSU हायडॅटिडोसिस किट
X

तुमच्या गाईंचे (Cow) दूध कमी झाले आहे का? गाई अशक्त होऊन तिचं वजन कमी झालं आहे का? आता चिंता करण्याची गरज नाही कारण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठानं (Mafsu) जनावरांच्या रोगांवर हायडॅटिडोसिस किट शोधून काढले असून तिला पेटंट देखील मिळाला आहे. सामान्यपणे महाराष्ट्रातील गोवंशामध्ये हायडेटिडोसिस रोगाचे प्रमाण ३% (टक्के) आहे. विशेष म्हणजे जिवंत प्राण्यांमध्ये या रोगाची लक्षणे सामान्यतः दिसून येत नाहीत.

त्यामुळे जनावरांचे पोस्टमार्टम म्हणजेच शरीरातील अवयवांचे शवविच्छेदन केल्यानंतर या रोगाचे निदान होते. या रोगाचा प्रार्दुभाव झालेल्या जनावरांमध्ये दुध देण्याची क्षमता व वजन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात तसेच वेळेवर उपचार न केल्यामुळे जनावरे दगावू शकतात आणि त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने या रोगाचे निदान करण्यासाठी जलद व प्रभावी हायडेंटिडोसिस किट विकसीत केले केले असून या परजीवी रोगाच्या निदानाकरीता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने विकसीत करण्यात आलेल्या एलायझा किटला पेटंट प्रदान मिळाले असल्याची माहिती सहाय्यक प्राध्यापक आणि योजना प्रमुख डॉ. रविंद्र झेंडे यांनी मॅक्स महाराष्ट्राचे बोलताना दिली.







ते पुढे म्हणाले,हायडॅटिडोसिस या परजीवी रोगाचे गोवंशामध्ये निदान करण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत 'प्राणिजन्य मानवी आजारावर सर्वांपर्यंत पोहोचविणारा उपक्रम' या संशोधन प्रकल्पांतर्गत गोवंशातील हायडेंटिडोसिस रोगाचे निदान' या विषयावर संशोधन करून विकसीत करण्यात आलेल्या एलायझा किटला भारतीय पेटेंट कार्यालय, बौद्धिक संपदा कायदे, भारत सरकार यांनी दिनांक ०४/०१/२०२३ रोजी या संशोधन कार्याकरीता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला पेटंट प्रदान करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील गोवंशामध्ये हायडेटिडोसिस रोगाचे प्रमाण ३% (प्रतिशत) आहे. जिवंत प्राण्यांमध्ये या रोगाची लक्षणे सामान्यतः दिसून येत नाहीत आणि त्याचे निदान मुख्यतः शरीरातील अवयवांचे शवविच्छेदन केल्यानंतर होते. या रोगाचा प्रार्दुभाव झालेल्या जनावरांमध्ये दुध देण्याची क्षमता व वजन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात तसेच वेळेवर उपचार न केल्यामुळे जनावरे दगावू शकतात आणि त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने या रोगाचे निदान करण्यासाठी जलद व प्रभावी हायडेंटिडोसिस किट विकसीत केले आहे.

आता मृत नाहीतर जिवंत गोवंशामध्ये हायडॅटिडोसिसचे खात्रीशीर निदान करता येईल आणि योग्य वेळी प्रभावी उपचार केल्यामुळे पशुरूग्ण वेदनामुक्त होईल तसेच शेतकरी व पशुपालक यांचे या आजारामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.

हायडेंटिडोसिस रोगनिदानाकरिता विकसीत करण्यात आलेल्या एलायझा किटचा उपयोग भारतातील उपलब्ध असणान्या पशुरोगनिदान करणा-या प्रयोगशाळेत तसेच पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय व दवाखाने येथे करता येईल तसेच हायडेंटिडोसिस रोगनिदान एलायझा किटचे व्यापक प्रमाणात उत्पादन करणे व प्रत्यक्षात उपयोगात आणणे फायदेशीर ठरेल व शेतकऱ्याचे हायडेंटिडोसिसमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल तसेच जनावरांपासून मिळणारे उत्पादन वाढवता येईल.





हे संशोधन पशुवैद्यकीय सामुहिक स्वास्थ्य विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई येथे करण्यात आले असून सदर संशोधनाच्या यशामध्ये डॉ. विलास वैद्य, सहाय्यक प्राध्यापक व योजना प्रमुख, डॉ. रविंद्र झेंडे, प्राध्यापक व विभाग प्रमुख, डॉ. आशिष पातूरकर, कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, डॉ. अशोक कुमार, सहाय्यक महासंचालाक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद व डॉ. चारूशीला राऊत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक या संशोधकांचे मोलाचे योगदान आहे. या संशोधनामध्ये विद्यापीठातील डॉ. आशिष पातूरकर, कुलगुरू डॉ. नितीन कुरकुरे, संचालक संशोधन, डॉ. शिरीष उपाध्ये, अधिष्ठाता तसेच डॉ. अजित रानडे, सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या संशोधन कार्यासाठी सर्व संशोधकांचे विद्यापीठ व इतर पशुवैद्यकीय महाविद्यालयीन स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.

Updated : 10 Jan 2023 8:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top