Home > News Update > खाते वाटपात विदर्भावर अन्याय; पाहा कोणत्या विभागाला किती मंत्रिपदे

खाते वाटपात विदर्भावर अन्याय; पाहा कोणत्या विभागाला किती मंत्रिपदे

खाते वाटपात विदर्भावर अन्याय; पाहा कोणत्या विभागाला किती मंत्रिपदे
X

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील राजकराणात एकाच वर्षात दोन राजकीय भूकंप झाले. शिवसेना फुटली आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाली. काही दिवसांनपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने बंड करत राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. दरम्यान या मंत्रिपदाचा कोणत्या विभागाला किती मंत्रिपद मिळाली ते आपण पाहाणार आहोत.

कोकण विभाग

कोकण विभागात एकूण 6 मंत्रिपद मिळाली आहेत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री, तर उदय सामंत यांना उद्योगमंत्री, दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण व मराठी भाषा तर अदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण, रवींद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता अशी सहा मंत्रिपद मिळाली आहेत.





छत्रपती संभाजीनगर विभाग

तर छत्रपती संभाजीनगर विभागा एकूण सहा मंत्रिपद मिळाली आहेत धनंजय मुंडे यांना कृषी, अतुल सावे यांना गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण, अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन तर संदीपान भुमरे यांना रोजगार हमी योजना व फलोत्पादन, प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, संजय बनसोडे यांना क्रीडा व युवक कल्याण, बंदरे अशी एकूण सहा मंत्रिपद ही छत्रपती संभाजीनगर विभागाला देण्यात आली आहेत





पुणे विभाग

दरम्यान पुणे विभागाला देखील सहा मंत्रिपद देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे-अर्थ, शंभूराज देसाई यांना राज्य उत्पादन शुल्क तर सुरेशभाऊ खाडे यांना कामगार, चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, दिलीप वळसे पाटील यांना सहकार तर

हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद देण्यात आल आहे




नाशिक विभाग

नाशिक विभागातला सर्वाधिक एकूण मंत्रिपद सात मंत्रिपद देण्यात आले आहेत. छगन भुजबळ यांना अन्न नागरी पुरवठा, गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन तर राधाकृष्ण विखे-पाटील यांना महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास, दादाजी भुसे यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तर गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे खाते देण्यात आले आहे. विजयकुमार कृष्णराव गावित यांना आदिवासी विकास तर अनिल पाटील यांना मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन अशी सात मंत्रिपद नाशिक विभागाला देण्यात आले आहे.




विदर्भ

तर पुन्हा एकदा विदर्भावर अन्याय झाला आहे सर्वात कमी मंत्रिपद हे विदर्भाच्या वाट्याला आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री

तर सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय मंत्रिपद मिळाल आहे. धर्मराव अत्राम यांना अन्न आणि औषध प्रशासन तर

संजय दुलिचंद राठोड यांना मृद व जलसंधारण अशी चार मंत्रिपद ही विदर्भाच्या वाट्याला आली आहे.





Updated : 14 July 2023 3:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top