वाघाच्या बछड्यांना १ वाजेपर्यंत गुहेतच राहण्याची तंबी
Max Maharashtra | 22 May 2019 11:40 PM IST
X
X
नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधानपदाचे नेते असण्यावर शिक्कामोर्तब करून परतल्यानंतर प्रितीभोजनात ओलावलेला हात सुकण्याआधीच शिवसेनेनं सावध पवित्रा घेतलाय. राज्यात युतीला ३५ ते ४० च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. त्यातही शिवसेनाला १६ते १९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र असं असलं तरीही शिवसेनेनं आपल्या बछड्यांना म्हणजेच प्रवक्त्यांना दुपारी एक वाजेपर्यंत कुठेही तोंड न उघडण्याची तंबीच व्हिपद्वारे दिलीय. राज्यात आणि देशात एनडीएला नेमक्या किती जागा मिळतील अथवा सरकार कसं बनतंय याची स्पष्टता दुपारपर्यंतच्या मतमोजणीनंतर आलेला कल स्पष्ट करू शकतो. त्यामुळंच शिवसेनेनं सावध पवित्रा घेतच आपल्या प्रवक्त्यांना ही सूचना दिली असावी.
Updated : 22 May 2019 11:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire