Home > News Update > या' जिल्ह्यातील १३ गावांमध्ये लॉकडाऊन ; कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना

या' जिल्ह्यातील १३ गावांमध्ये लॉकडाऊन ; कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना

या जिल्ह्यातील १३ गावांमध्ये लॉकडाऊन ; कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना
X

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनानाचे संक्रमण थांबवण्यासाठी, तसेच १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या गावांमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने १० दिवसांपूर्वी ६१ गावांत लॉकडाऊन केले होते. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील नव्याने १३ गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.

जिल्ह्यात दैनंदिन कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे ३०० ते ५०० आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधित होण्याचे प्रमाण हे ३ ते ५ टक्के आहे. दरम्यान जिल्ह्यात २० पेक्षा अधिक सक्रिय कोरोना रुग्ण असणाऱ्या गावात जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करणे, बॅरिकेटींग करणे, पोलिस बंदोबस्त वाढविणे, जनता कर्फ्यूच्या माध्यमातून गाव बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोबतच नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करणे, कोरोना नियमानुसार वर्तणूक ठेवणे, चाचण्या वाढवणे, या उपाययोजना केल्या जात आहेत.

तरी देखील १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या गावात या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत, असे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने जिल्हा प्रशासनाने त्या गावांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सक्रिय करोना रुग्ण असणाऱ्या गावात अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, कोरोना चाचणी केंद्र वगळता अन्य सर्व १४ ऑक्टोबरला पहाटे १ वाजल्यापासून ते २३ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत बंद असणार आहे.

'या' गावांचा लॉकडाऊनमध्ये समावेश

लॉकडाऊन लागू केलेल्या गावांमध्ये वीरगाव, सुगाव बु., कळस बुद्रूक (अकोले), टाकळी (कोपरगाव), चांदा (नेवासे), जामगाव, वासुंदे (पारनेर), वेल्हाळे, उंबरी, चंदनापुरी, वडगाव पान, राजापुर, नांदुरी दुमला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बु, जोर्वे (संगमनेर), लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ (श्रीगोंदा), पिंपळगाव माळवी (नगर) या गावांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनानाचे संक्रमण थांबवण्यासाठी, तसेच १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या गावांमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने १० दिवसांपूर्वी ६१ गावांत लॉकडाऊन केले होते. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील नव्याने १३ गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.

जिल्ह्यात दैनंदिन कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे ३०० ते ५०० आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधित होण्याचे प्रमाण हे ३ ते ५ टक्के आहे.

दरम्यान जिल्ह्यात २० पेक्षा अधिक सक्रिय कोरोना रुग्ण असणाऱ्या गावात जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करणे, बॅरिकेटींग करणे, पोलिस बंदोबस्त वाढविणे, जनता कर्फ्यूच्या माध्यमातून गाव बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोबतच नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करणे, कोरोना नियमानुसार वर्तणूक ठेवणे, चाचण्या वाढवणे, या उपाययोजना केल्या जात आहेत.

तरी देखील १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या गावात या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत, असे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने जिल्हा प्रशासनाने त्या गावांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे सक्रिय करोना रुग्ण असणाऱ्या गावात अत्यावश्यया' जिल्ह्यातीलक सेवा, दवाखाने, मेडिकल, कोरोना चाचणी केंद्र वगळता अन्य सर्व १४ ऑक्टोबरला पहाटे १ वाजल्यापासून ते २३ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत बंद असणार आहे.

'या' गावांचा लॉकडाऊनमध्ये समावेश

लॉकडाऊन लागू केलेल्या गावांमध्ये वीरगाव, सुगाव बु., कळस बुद्रूक (अकोले), टाकळी (कोपरगाव), चांदा (नेवासे), जामगाव, वासुंदे (पारनेर), वेल्हाळे, उंबरी,

चंदनापुरी, वडगाव पान, राजापुर, नांदुरी दुमला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बु, जोर्वे (संगमनेर), लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ (श्रीगोंदा), पिंपळगाव माळवी (नगर) या गावांचा समावेश आहे.

Updated : 16 Oct 2021 3:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top