Home > Election 2020 > राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज

राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज

राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज
X

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमधील वायनाड मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. 2014 ला फक्त अमेटी मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकीत वायनाड आणि अमेटी या दोन मतदार संघातून मैदानात उतरणार आहेत.

अमेठीत राहुल गांधींचा सामना भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याशी होणार आहे. तर इकडे वायनाडमध्ये राहुल गांधींची लढत एलडीएफचे पी.पी.सुनीर यांच्याबरोबर होणार आहे.

कुठे आहे वायनाड मतदार संघ?

वायनाड मतदार संघ उत्तर केरळमध्ये असून कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या सीमेवर हा मतदारसंघ आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीआधी मतदारसंघ पूनर्रचनेमध्ये वायनाड हा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार झाला असून हा मतदारसंघ राहुल गांधी यांच्य़ासाठी सुरक्षित असल्यानं राहुल गांधी यांनी या मतदार संघातून आज अर्ज दाखल केला आहे.

काय आहे वायनाड मतदारसंघाची गणितं?

वायनाड मतदारसंघ हा मुस्लीम बहुल मतदारसंघ असून या मतदारसंघात एकूण सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये वायनाड जिल्ह्यातील आणि मलप्पूरम जिल्ह्यातील प्रत्येकी तीन असे 6 तालुके झीकोडेमधील एक विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.

कॉंग्रेसची मदार मुस्लीम मतांवर?

वायनाड लोकसभा मतदारसंघातील एकूण 7 विधानसभा संघाचा विचार केला तर एकूण १३ लाख २५ हजार ७८८ मतदारांपैकी ५६ टक्के मुस्लिम मतदार आहेत. या मतदारसंघात काँग्रेसची मदार अल्पसंख्याक मतांवर आहे. त्यात मलप्पूर जिल्ह्यात मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे.

वायनाड जिल्ह्यातील लोकसंख्या गणित?

हिंदू लोकसंख्या ४९.७ %

ख्रिश्चन २१.५ %

मुस्लिम लोकसंख्या : २८.८ %

मलप्पूरम जिल्ह्यातील लोकसंख्या गणित?

मलप्पूरम जिल्ह्यातील मतदार संघांचा विचार केला तर...

मुस्लिम लोकसंख्या ७०.४ %

हिंदू २७.५ %

ख्रिश्चन 2 टक्के

इंडियन युनियम मुस्लिम लीगचा राहुल गांधींना पाठींबा?

यूडीएफचा घटक पक्ष असलेल्या इंडियन युनियम मुस्लिम लीगची मलप्पूरममधील तीन आणि कोझीकोडेमधील एका विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींना मुस्लिम लीगच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राहुल गांधींसाठी हा मतदार संघ सुरक्षित मानला जात आहे.

राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज.. बघा हा व्हिडिओ...

Updated : 4 April 2019 8:34 AM GMT
Next Story
Share it
Top