Home > News Update > काळाराम मंदिराच्या प्रमाणे होणार आयोध्येतील नव्या राम मंदिराचे पूजाविधी...

काळाराम मंदिराच्या प्रमाणे होणार आयोध्येतील नव्या राम मंदिराचे पूजाविधी...

काळाराम मंदिराच्या प्रमाणे होणार आयोध्येतील नव्या राम मंदिराचे पूजाविधी...
X

येत्या जानेवारी महिन्यात आयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन ते लोकांच्या दर्शनासाठी खुले होणार आहे. यासाठी हिंदू धर्म संसद आणि हिंदू धर्माच्या विविध संस्था, संघटनानी सहा महिन्या पूर्वीच काम करण्यास सुरुवात केली असून इतिहासातील अदभूत असा हा सोहळा व्हावा असा प्रयत्न सरकार आणि देशातील हिंदू धर्म संघटनाच्या वतीने केला जात आहे.

नाशिक, पंचवटी येथील काळाराम मंदिराचे देशातील राम मंदिरात विशेष स्थान असून आता या राम मंदिरात महंत सुधीरदास महाराज यांची सतावीसवी पिढी सेवा करते आहे. आयोध्येतील पुजारी आणि विश्वस्त मंडळीनी काही महिन्यापूर्वी नाशिक येथील काळाराम मंदिर देवस्थानास भेट दिली आणि त्यांच्याकडून जुने ग्रंथ, पूजा विधी, उत्सव यासंदर्भात माहिती घेतली व श्री राम या देवतेच्या पूजा विधी चे नियम आणि संस्कार जाणून घेतले. त्यामुळे नाशिक येथील काळाराम मंदिर हे आयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधीत मार्गदर्शकच्या भूमिकेत आहेत. याबद्दल आमचे प्रतिनिधी किरण सोनावणे यांनी थेट नाशिक येथील काळामंदिरात महंत सुधीरदास महाराज यांच्याशी बातचीत केली.

Updated : 12 Nov 2023 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top