Home > News Update > वीज कोसळून शेतकऱ्याचा 300 क्विंटल कांदा जळून खाक...

वीज कोसळून शेतकऱ्याचा 300 क्विंटल कांदा जळून खाक...

वीज कोसळून शेतकऱ्याचा 300 क्विंटल कांदा जळून खाक...
X

राज्यात आता मान्सूनला सुरुवात झाली आहे. या पावसात धुळे तालुक्यातील बुरझडसह परीसरात विजेच्या गडगडाटांसह मुसळधार पाऊस झाला. यातच बुरझड शिवारात शेतकऱ्यांने साठवणूक केलेल्या कांदाचाळीत वीज कोसळून सुमारे ३०० क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे.

पावसाने वाढता जोर धरल्याने यात बुरझड येथील शेतकरी शरद उत्तम पाटील यांच्या रस्त्यालगत असलेल्या शेतातील कांदा चाळीवर वीज कोसळल्याने सुमारे ३०० क्विंटल कांदा जळून खाक झाला.

वीज पडल्यानंतर सुमारे दीड तास सुरु असलेल्या पावसामुळे कांदयाचे नुकसान झाले यावेळी प्रशासकीय अधिकारी यांनी याची दखल घेत पंचनामा केला आहे. .

Updated : 8 Jun 2021 5:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top