Home > News Update > LIC Policy Holders - अदानी समूहातील गुंतवणुकीबाबत एलआयसीचा खुलासा

LIC Policy Holders - अदानी समूहातील गुंतवणुकीबाबत एलआयसीचा खुलासा

LIC Policy Holders - अदानी समूहातील गुंतवणुकीबाबत एलआयसीचा खुलासा
X

हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) या संस्थेच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असलेल्या एलआयसीच्या पॉलिसीधारकांमध्ये (LIC Policy Holders) चिंतेचं वातावरण पसरलं होतं. मात्र, आता एलआयसीच्या प्रमुखांनीच याबाबत खुलासा केला आहे.

कोट्यवधी भारतीयांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या एलआयसीमध्ये भारतीयांनी पॉलिसीद्वारे मोठ्याप्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली आहे. मात्र, याच एलआयसीने अदानी समूहाच्या (Adani Group Of Compaines) विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे विरोधकांनी अदानींसह एलआयसीवरही मोठ्या प्रमाणात टीका केली. काँग्रेस पक्षाने तर देशभरात एलआयसीच्या कार्यालयांसमोर आंदोलने केली. यापार्श्वभूमीवर एलआयसीचे अध्यक्ष एम.आर.कुमार (LIC Chairman MR Kumar) यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, एलआयसीची पॉलिसी घेतलेल्या आणि एलआयसीचे शेअर्स घेतलेल्या नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, त्यांनी त्यांच्या गुंतवणूकीबद्दल निश्चिंत रहावं" हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला.

त्याच अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक असल्याने एलआयसी पॉलिसीधारकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे एलआयसीचे अध्यक्ष एम.आर.कुमार यांनी केलेला खुलासा हा महत्त्वाचा मानला जातोय. कुमार म्हणाले की, एलआयसीचे शेअर्स विकत घेतलेल्या लोकांना आणि पॉलिसीधारकांना घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. त्यांच्यासाठी एक टक्काही जोखीम नाही. त्यांच्या गुंतवणूकीवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही" असा खुलासाह कुमार यांनी केला आहे.

LIC मध्ये अदानी समूहाची किती गुंतवणूक आहे ?

LIC ने अदानी समूहात किती गुंतवणूक केली आहे, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. यापार्श्वभूमीवर आता एलआयसीनेच स्पष्टीकरण दिले आहे. अदानी समूहात एक टक्क्यापेक्षा कमी गुंतवणूक केल्याचे एलआयसीने स्पष्ट केले. आता ही गुंतवणूक म्हणजे एकूण मालमत्तेच्या 0.975 टक्के एवढी आहे. डिसेंबर 2022 च्या अखरेपर्यंत अदानी समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक ही 35 हजार 917 कोटी 31 लाख रूपये होती. या गुंतवणूकीत इक्विटी आणि कर्ज दोन्हींचा समावेश आहे. त्यापैकी 6 हजार कोटी हे कर्ज दाखवण्यात आलेले आहे.

Updated : 11 Feb 2023 8:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top