Home > News Update > Barti : बार्टीला न्यायालयात खेचू ; वंचित आघाडीचा इशारा

Barti : बार्टीला न्यायालयात खेचू ; वंचित आघाडीचा इशारा

Barti : बार्टीला न्यायालयात खेचू ; वंचित आघाडीचा इशारा
X

पीएचडी (Phd)आधी छात्रवृत्ति करिता १० जानेवारी रोजी होणारी चाळणी परीक्षा रद्द करण्याच्या संदर्भात प्रस्ताव देण्याचा निर्णय बार्टीकडून 30 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर या प्रस्तावावर निर्णय देत असताना 10 जानेवारी रोजी होणारी चाळणी परीक्षा ही पूर्वनियोजित पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सारथी, महाज्योती आणि बार्टी या संस्थांच्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांकरिता आधी छात्रवृत्तिसाठी चाळणी परीक्षा 24 डिसेंबरला घेण्यात आली. मात्र, यामध्ये 2019 चा पेपर कॉपी-पेस्ट करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. यानंतर ही परीक्षा रद्द करत पुन्हा नव्याने 10 जानेवारीला चाळणी परीक्षा घेण्याचे ठरले. मात्र, या विरोधात बार्टी संशोधक विद्यार्थी आणि वंचित बहुजन युवा आघाडीने आंदोलन केल्यानंतर तीस डिसेंबर रोजी पार्टीच्या संचालकांना ही परीक्षा रद्द करत असल्याचा प्रस्ताव मांडला आणि परीक्षा रद्द करत असल्याचे घोषित केले. मात्र, मंगळवारी दोन जानेवारी रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला जुगारत १० जानेवारीला नियोजित पद्धतीने चाळणी परीक्षा होणार असल्याचे बार्टी ने स्पष्ट केले आहे. आधी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून विद्यार्थी वर्गाकडून रोष व्यक्त केला जात आहे. बार्टीने घेतलेल्या या सर्व भूमिकेवरून शासनाला कोर्टात खेचण्याचा इशारा वंचित बहुजन युवक आघाडीने दिला आहे.

Updated : 3 Jan 2024 8:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top