Home > News Update > अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटयाचा जागीच मृत्यूः मुंबई - आग्रा महामार्गावरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटयाचा जागीच मृत्यूः मुंबई - आग्रा महामार्गावरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटयाचा जागीच मृत्यूः मुंबई - आग्रा महामार्गावरील घटना
X

धूळेः धूळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या लळींग या घाटामध्ये मूंबई - आग्रा या महामार्गावर बिबटयाचा रात्रीच्या दोन ते अडीच वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना उघटकीस आली आहे. मृत बिबटयाचे वय साधारणपणे पाच वर्ष असल्याचा अंदाज आहे मुंबई - आग्रा या महामार्गावर ही घटना घडली असून महामार्गाच्या लगत असलेल्या जंगल परीसरात वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. जंगलातून महामार्ग ओलांडत असताना बिबटयाला भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभाचे अधिकारी व त्यांची टीम पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबटयाची वैद्यकीय तपासणी करुन त्याला मृत घोषीत केले आणि त्याचे शवविच्छेदन करुन त्यावर अंतिम संस्कार देखील करण्यात आले. या संदर्भातील माहिती पशुवैद्यकीय अधिकारी भूषण वाघ यांनी दिली आहे.

Updated : 16 Jan 2024 10:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top