Home > News Update > जागा वाटपाचा तिढा सुटणार? महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक

जागा वाटपाचा तिढा सुटणार? महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक

जागा वाटपाचा तिढा सुटणार? महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक
X

निवडणूक आयोगाकडून नुकतंच लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या असून महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटला नाही अशी परिस्थिती आहे.

यामुळे हा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आज महायुतीमधल्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत होणारी जागावाटपाची ही शेवटची बैठक असून यात जागावाटपाची अधिकृत घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. त्यामूळे दिल्लीतील ही बैठक महत्वाची मानली जात असून या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित राहू शकतील असं शक्यता आहे.

लोकसभा निवडणूकीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रितपणे महायुतीत निवडणूक लढणार आहेत. मात्र महायुतीच्या जागावाटपासंदर्भातला निर्णय मार्गी लागत नसल्याने शिवसेना आणि अजित पवारांनी आपले उमेदवार अजूनही जाहीर केलेले नाहीत. एकुण दहा मतदारसंघारून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असून जागावाटपाचा तिढा सोडवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संभाजीनगरच्या जागेवरून ओढाताण

छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत एकमत होत नसल्याने भाजप आणि शिनसेनेत ओढाताण होत असल्याचं चित्र आहे. भाजप-शिवसेना युतीत पारंपारिक पध्दतीने हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र आता भाजपकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी तयार नाही. त्यामूळे आजच्या बैठकीत या मतदारसंघावर देखील चर्चा होईल अशी शक्यता आहे.

Updated : 17 March 2024 6:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top