Home > News Update > नेते मतासाठी येतात दुर्घटना झाल्यावर नाही : शालिनी ठाकरे

नेते मतासाठी येतात दुर्घटना झाल्यावर नाही : शालिनी ठाकरे

13 मार्च रोजी सायंकाळी 5.00 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील अप्पापाडा, मालाड पूर्व, आनंदनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली. गेल्या दोन दिवसापासून अप्पा पाडा येथील परिस्थिती गंभीर आहे. मात्र राजकारणी आणि प्रशासन पिडीतांसाठी कोणतीच मदत करत नाहीयं.

नेते मतासाठी येतात दुर्घटना झाल्यावर नाही : शालिनी ठाकरे
X

मॅक्स महाराष्ट्र (Max Maharashtra) च्या ग्राउंड रिपोर्ट नुसार,गेले दोन दिवस उलटून कोणतीही मदत किंवा ठोस निर्णय या लोकांसाठी घेण्यात आलेला नाही. या लोकांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेल्या वर्षी गणपती महोत्सवात रात्री अडीच वाजता आले होते. त्या वेळेस शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अश्या घोषणा देऊन एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. परंतु इतकी मोठी घटना होऊनही या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परिस्थिती बघायला सुद्धा नाही आले. अशी खंत पीडित नागरिकांनी व्यक्त केली.

तुम्ही मतं मागायला येता, नुसतं येत नाही तर लोटांगण घालतातं. मग आता इतकी मोठी घटना होऊनही सगळे कसे शांत आहे. आत्ता पर्यंत कोणीही बघायला आलं नाही माग ते नगरसेवक असो किंवा कोणताही राजकीय नेता असो कोणीही पीडितांना बघायला आले नाही. भाई जगताप (Bhai Jagtap), शालिनी ठाकरे (Shalini Thackeray), मेधा पाटकर (Medha Patkar) इथे येऊन गेले परंतु येऊन काहीही मार्ग नाही काढला तर ते फक्त पाहणी करून गेले.

शालिनी ठाकरे यांनी bytes साठी नकार दिला पण मॅक्स महाराष्ट्र च्या प्रतिनिधीने ते पाहणी करत असताना काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. तुम्ही इथे आलात इथली परिस्थिती पहिली तर तुम्ही यावर कश्या पद्धतीने ऍक्शन घ्याल, यांच्या मागण्या कश्या पद्धतीने पूर्ण कराल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कधी येणार आहेत, राज ठाकरे यांना काय सांगाल इकडच्या परिस्थिती बद्दल आणि या लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या कडून कोणत्या प्रकारची मदत केली जाणार आहे...असं विचारलं असता त्यांनी सांगितलं कि "मी पाहतेय इकडची अवस्था अतिशय भयानक आहे. इथल्या लोकांचा अक्षरशः संसार उध्वस्थ झाला आहे. काहीच उरलेल नाहीये. इथे लोकं मतं मागायला येतात पण आता कोणीच का काही करत नाहीयेत. नेते फक्त मत मागण्या साठी येतात दुर्घटना घडली कि नाही येत. आणि मुळात मुख्यमंत्री कसे शांत बसले आहेत. त्यांनी काही तरी इकडच्या पीडितांसाठी करावे असं मला वाटतं.

मी माझ्या पद्धतीने पूर्ण मदत करेन, राज ठाकरे यांना मी सांगेल इथली दुर्दशा, त्यांना इकडे येणे शक्य होणार नाही परंतु ते या विषयावर नक्कीच काही तरी करतील याचा मी प्रयत्न करेन.भाई जगताप, आणि मेधा पाटकर यांचं असं वक्तव्य होतं कि, करतो काही तरी, बघतो. फारच गंभीर परिस्थिती आहे. लवकरचं घेतो ऍक्शन. एकंदरीतच अप्पापाडा (अप्पा pada) जळीतकाळांतील पिडीतांना वाली उरला नसल्याचे चित्र आहे.

Updated : 2023-03-16T11:32:44+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top