सरन्यायाधीशांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास विद्यार्थीनीचा नकार

Courtesy : Social Media

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगई यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारायला एका मुलीने नकार दिला आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करण्यात आले होते. हेच कारण देत सुरभी कारवा नावाच्या मुलीने सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या हस्ते पुरस्कार घेण्याचे टाळले.

दिल्ली येथील नॅशनल लॉ युनीव्हर्सिटी मधील कार्यक्रमादरम्यान प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या एलएलएमची विद्यार्थ्यीनी सुरभी कारवाचे नाव पुकारण्यात आले. तेव्हा सुरभी कार्यक्रमात उपस्थित नसून तिच्या ऑफिसमध्ये होती. तेव्हा तिच्या अनुपस्थितीत तिचे पारीतोषीक प्रोफेसर जी. एस. बाजपाई यांनी स्विकारले. महत्वाची बाब म्हणजे जेव्हा सुरभाीला कळाले की, तिला या कार्यक्रमादरम्यान सरन्याधीश रंजन गोगाई यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे. त्यामुळेच तिने कार्यक्रमास येणे टाळले.

हेही वाचा

गोगोईंवरील आरोपांची चौकशी करावी – महाधिवक्ता

एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर त्यांच्या कार्यालयात ज्युनियर कोर्ट असिस्टेंट म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली होती.

परंतु समितीने सरन्यायाधीश गोगोईवरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आणि त्यांच्याविरूद्ध कोणताही पुरावा मिळालेला नाही. न्यायमूर्ती गोगोई यांना क्लीन चीट मिळाली. मात्र, त्यानंतर आरोप करणाऱ्या महीलीने निराशा व्यक्त करत तिच्यावर अत्याचार झाल्याचे म्हटले. त्यामुळे ही घटना चर्चेत आली आहे.

हेही वाचा

सरन्यायाधीशांना बदनाम करण्याची मलाही ऑफर आली होती – उत्सव बैंस

याच कारणामुळे सुरभी कारवा या विद्यार्थीनीने रंजन गोगाई यांच्या हस्ते पुरस्कार घेणे टाळले. तसेच अभ्यासादरम्यान शिकलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे माझ्या मनात शंका निर्माण झाली की मी सरन्यायाधीश गोगोई यांच्याकडून हा पुरस्कार घ्यावा की नाही. जेव्हा त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाला तेव्हा ही संस्था पूर्णपणे अपयशी ठरली होती. असं मत सुरभी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

हेही वाचा

लैंगिक शोषणाच्या आरोपातून गोगोईंची सुटका

घटनात्मक मूल्यांच्या रक्षणासाठी वकिलांनी काय भूमिका घ्यावी? या प्रश्नाचं उत्तर मी स्वतःला विचारत आहे. आणि या त्याच गोष्टी आहेत ज्या सरन्याधीश रंजन गोगाई यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला होता.