Home > News Update > नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार- खोत

नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार- खोत

नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार- खोत
X

नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये विविध विकास कामांमध्ये प्रचंड सवाल गोंधळ असल्याचा आरोप करत याबाबत दोषींवर कारवाई करण्यासाठी शासनाला भाग पाडू असं सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. नांदेडमध्ये पंचायत राज समिती दाखल झाली आहे. यामध्ये विविध पक्षांचे सदस्य देखील आहेत, यावेळी हे सदस्य तीन दिवशीय पाहणी दौरा करत आहेत.

दरम्यान या पंचायत राज समितीचे सदस्य असलेले सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना आमदार रस्ता पाहणीसाठी गेले असता पूर्वसूचना देऊन देखील एक सुद्धा अधिकारी तिकडे फिरकला नाही व जेमतेम अधिकारी आले होते ते अधिकारी साहेबांनी बोलावलं म्हणून निघून गेले असं म्हणाले आहेत.

सोबतच विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे दिसत असून अनेक तक्रारी आमच्याकडे देखील आले आहेत आम्ही शासनाला कारवाई करण्यास भाग पाडू असे सदाभाऊ खोत म्हणाले.

Updated : 2 Sep 2021 6:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top