Home > News Update > नेरळ ते माथेरान दरम्यान दरड कोसळली, माथेरानचा संपर्क तुटला

नेरळ ते माथेरान दरम्यान दरड कोसळली, माथेरानचा संपर्क तुटला

नेरळ ते माथेरान दरम्यान दरड कोसळली, माथेरानचा संपर्क तुटला
X

रायगड – जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे अऩेक ठिकाणी दरड कोसळण्याच्यां किंवा भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. माथेरानमधील घाटातही दरड कोसळली आहे. तसेच डोंगवरची माती रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला आहे. नेरळ ते माथेरानला जाणा-या घाटात ही घटना घडली आहे. माथेरानकडे जाण्या-येण्याचा रस्ता बंद झाल्याने संपर्क तुटला आहे. स्थानिकांची टीम या ठिकाणी मदतीला पोहोचली आहे. पण मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने ती रस्त्यामधून हटवण्यात अडचणी येत आहेत. तसेच पाऊसही सुरू असल्याने काम वेगाने करता येऊ शकत नाहीये.

संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अतिवृष्टी सुरू झाली आहे. संपूर्ण कोकणातही पावसाचा जोर वाढला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्हयात पावसाने जोर धरला आहे. बहुतांशी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अगोदरच नदीकाठीवरील गावांना सतर्क केले होते, त्यामुळे जीवितहानी झालेली नाही.

Updated : 19 July 2021 11:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top