Home > News Update > मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुक सुरळीत

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुक सुरळीत

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुक सुरळीत
X

पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मध्यरात्री दोन ठिकाणी दरड कोसळली. आधी खंडाळा घाटात तर नंतर लोणावळ्यातही दरड कोसळली होती.

दरम्यान आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही दरड कोसळली होती. तर नंतर लोणावल्याजवळ ही दरड कोसळली. सध्या लोणावळा लगत मार्गावरील दरड हटविण्याचे काम जोरदार सुरु आहे. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतुक पुन्हा विस्कळीत झाली होती. सध्या ही वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आयआरबी, देवदूत यंत्रणा, तसेच महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घाटात पडलेली दरड हटवण्याचे काम रात्री सुरू करण्यात आले. जेसीबी, डंपरच्या साह्याने दरड काढण्याचे काम सुरू होते. वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या तीन मार्गिकेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन वळविण्यात आल्या होत्या परंतु आता पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील दरड हटवल्यानंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.

Updated : 24 July 2023 3:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top