Home > News Update > दरड कोसळली, रस्ता गेला वाहून, गावकरी संकटात

दरड कोसळली, रस्ता गेला वाहून, गावकरी संकटात

दरड कोसळली, रस्ता गेला वाहून, गावकरी संकटात
X

रायगड - महाड तालुक्यात दरड कोसळल्याने ६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही या भागात अनेक ठिकाणी दरडींचा धोका कायम आहे. रायगड किल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाजवळ सकाळी दरड कोसळली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महाडमधील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेली हिरकणीवाडी धोकादायक स्थितीत आहे.



तिवृष्टीच्या तडाख्यात येथील घरांच्या खालची माती खिळखिळी झाली आहे. त्यामुळे कधी काय होईल? सांगता येणार नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या ठिकाणी प्रशासनाने तातडीने मदत पोहोचवावी अशी मागणी इथल्या गावकऱ्यांनी केली आहे.




Updated : 24 July 2021 10:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top