Home > News Update > Covid झाल्यानंतर ललित मोदी सात दिवसांपासून ऑक्सिजनवर..

Covid झाल्यानंतर ललित मोदी सात दिवसांपासून ऑक्सिजनवर..

Covid झाल्यानंतर ललित मोदी सात दिवसांपासून ऑक्सिजनवर..
X

आयपीएलचे (IPL) माजी अध्यक्ष ललित मोदी (Ex-IPL chief Lalit Modi) मृत्यूच्या सापळ्यातून परतले आहेत. त्यांना इन्फ्लूएंझा, न्यूमोनिया व या दोन आठवड्यात दोनदा कोविड (Covid १९) झाला होता. मेक्सिको सिटीमध्ये सध्या वास्तव्यास असलेले ललित मोदी यांना त्यांच्या मुलाने विमानाने लंडनला नेले आणि तेथे त्यांच्यावर उपचार केले. ललित मोदींनी स्वतः इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली.

ललित मोदींनी इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, डॉक्टर आणि मुलगा कुशल यांनी मला एअर अॅम्ब्युलन्सने लंडनला आणले आणि माझ्यावर उपचार केले, त्यामुळे मी मृत्यूतून परत येऊ शकलो, पण तरीही मला 24 तास ऑक्सिजनवर राहावे लागेल. दोन डॉक्टरांनी माझ्यावर 3 आठवडे उपचार केले आणि माझे सतत निरीक्षण केले. एका डॉक्टरने मेक्सिको सिटीमध्ये माझी काळजी घेतली आणि दुसर्‍याने लंडनमध्ये माझी काळजी घेतली. त्याचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत.

ललित मोदीचे वादग्रस्त प्रवास, ''12 वर्षांपूर्वी देश सोडून पळून गेले'' ललित मोदींनी आयपीएल (IPL) सुरू केले. ते 2005 ते 2010 पर्यंत बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष होते. 2008 ते 2010 या काळात ते आयपीएलचे अध्यक्ष (Ex-IPL chief ) आणि आयुक्त होते. 2010 मध्ये ललित मोदी यांना हेराफेरीच्या आरोपावरून आयपीएल कमिशनर पदावरून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना बीसीसीआयमधूनही निलंबित करण्यात आले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering) आरोप झाल्यानंतर ते 2010 मध्ये देश सोडून पळून गेला होता.

Updated : 14 Jan 2023 7:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top