Home > News Update > कुंभमेळा 'सुपरस्प्रेडर' ठरला

कुंभमेळा 'सुपरस्प्रेडर' ठरला

गतवर्षी मरकझवर टीका झाली असताना आता जगभरातून टीका होत असताना सरकारी पाठिंब्यावर 70 लाख भाविकांना विना मास्क एकत्र आणून कुंभमेळा भरवण्याची कृती आता सुपर स्प्रेडर ठरल्याचे‌ सिध्द झाले आहे.

कुंभमेळा सुपरस्प्रेडर ठरला
X

सरकारी आकड्यानुसार आत्तापर्यंत 2600 भाविकांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या त्यांच्या राज्यात परतणार्‍या सर्वच भाविकांना आता कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने देश हादरुन निघालेला असतानाच, मध्य प्रदेशातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हरिद्वारच्या कुंभमेळ्याहून राज्यात परतलेले जवळपास सर्व भाविक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यांपैकी ६० लोक विदिशा जिल्ह्यातील ज्ञारासपूरमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञारासपूरमधील सुमारे ८३ लोक कुंभमेळ्याला गेले होते. परतल्यानंतर त्यांपैकी ६० लोकांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. इतर २२ जणांचा शोध घेणे सध्या सुरू आहे. तर केवळ एकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर विदिशा जिल्हा प्रशासनाने या २२ लोकांना शोधण्याचे आदेश दिले आहेत. या लोकांना शोधून, त्यांना विलगीकरणात ठेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यास प्रशासनाने सांगितले आहे.

गंगामातेच्या कृपेने उत्तराखंडमध्ये कोरोना पसरणार नाही, असा अजब दावा उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी केला होता. हरिद्वारमध्ये होत असलेल्या कुंभमेळा आणि शाही स्नानामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने त्यांनी हा दावा केला आहे. तसेच मरकजची तुलना कुंभमेळ्याशी करणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले होते.





हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. कित्येक भाविकांसह साधूही कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागल्यानंतर अखेर हा कुंभ आटोपता घेण्यात आला होता. कुंभ मेळ्यातील भाविक सुपर स्प्रेडर ठरू शकतात अशी भिती कित्येकांनी व्यक्त केली होती. काही राज्यांनी कुंभवरुन येणाऱ्यांना विलगीकरणात राहण्याची सक्तीही केली होती.

मध्य प्रदेशनेही कुंभहून परतणाऱ्यांना विलगीकरणाची सक्ती लागू केली आहे. तसेच, हरिद्वारहून परतल्यानंतरही प्रशासनापासून ही गोष्ट लपवून ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

राम गोपाल वर्मा यांनी ट्विटर अकाऊंटवर कुंभमेळ्यातील अफाट गर्दीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी 'तुम्ही पाहात असलेला कुंभमेळा नाही तर करोना अ‍ॅटम बॉम्ब आहे… मला आश्चर्य वाटते की या एक्सप्लोजरचा दोष कोणाला द्यायचा' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. अनेकांनी यावर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे

मध्य प्रदेशात सध्या सहा लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यांपैकी सुमारे सहा हजार रुग्णांचा बळी गेला असून, पाच लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ८५ हजार ७५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कुंभमेळ्यातीली तुफान गर्दीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील काही फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्री रिचा चड्ढाने ट्विटर अकाऊंटवर ट्वीट केले आहेत. हे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत तिने 'हा कार्यक्रम करोना सुपर स्प्रेडर आहे' असे म्हटले आहे. रिचाच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत तुझे अगदी बरोबर आहे असे म्हटले

मध्यप्रदेश मध्ये हरिद्वारहून परत येणाऱ्या भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात करुणा ची लागण आढळून आल्याने आतार इतर राज्यांनी देखील धसका घेत हरिद्वारावरून येणाऱ्या सर्व भाविकांची विलगीकरणात ठेवून त्यांची कोरोना टेस्ट करण्याचे ठरवले आहे. मध्यप्रदेशातील कुंभमेळा भाविकांच्या पॉझिटिव्हिटी चा रेट पाहता 70 लाख परत आलेले भाविक नेमक्या किती लोकसंख्येला करुणा बाधित करणार ? सर्वांचे विलगीकरण आणि उपचार कसे होणार ?हे प्रश्न देखील आता उपस्थित झाले आहे.

Updated : 4 May 2021 3:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top