Home > News Update > खळबळजनक : केजरीवाल यांच्या घरी दहशतवाद्यांचे समर्थक येत होते की नाही, कुमार विश्वास यांचा सवाल

खळबळजनक : केजरीवाल यांच्या घरी दहशतवाद्यांचे समर्थक येत होते की नाही, कुमार विश्वास यांचा सवाल

पंजाबमध्ये मतदानाला काही तास शिल्लक असतानाच केजरीवाल यांचे जुने सहकारी कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.

खळबळजनक : केजरीवाल यांच्या घरी दहशतवाद्यांचे समर्थक येत होते की नाही, कुमार विश्वास यांचा सवाल
X

पंजाबमध्ये मतदानाची तारीख जवळ येत असतानाच आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांचे जुने सहकारी कुमार विश्वास यांनी गंभीर आरोप केला आहे.

पंजाबमध्ये मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मी पंजाबचा मुख्यमंत्री किंवा स्वतंत्र खलिस्तानचा पंतप्रधान बनेल, असे वक्तव्य केले असल्याचा गंभीर आरोप केजरीवाल यांचे जुने सहकारी कुमार विश्वास यांनी केला आहे.

पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याआधी काही दिवस अरविंद केजरीवाल यांचे जुने सहकारी असलेल्या कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांनी स्वतंत्र खलिस्तानचे पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचा गंभीर आरोप कुमार विश्वास यांनी केला होता. त्यावर आम आदमी पक्षाने तिखट प्रतिक्रीया दिल्यानंतर कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांना खुले आव्हान देत त्यांनी समोरासमोर येऊन दहशतवाद्यांचे समर्थक असलेले लोक तुमच्या घरी येत होते की नाही? असा सवाल विचारला आहे.

2017 साली झालेल्या पंजाब निवडणूकीदरम्यान खलिस्तान समर्थक लोक अरविंद केजरीवाल यांची भेट घेत होते. दरम्यान कुमार विश्वास यांनी त्यांना विचारले की, तुम्ही या खलिस्तान समर्थक लोकांशी संपर्क ठेवणे योग्य नाही. त्यावरून अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, झालो तर खलिस्तान समर्थक देशाचा पंतप्रधान होईल, असा आरोप कुमार विश्वास यांनी केला होता. त्यानंतर आम आदमी पक्षाने कुमार विश्वास यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. मात्र कुमार विश्वास यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अरविंद केजरीवाल यांच्या घरी दहशतवादी समर्थक लोक येत होते की नाही? त्यांनी समोरासमोर येऊन सांगावे, असे आव्हान दिले आहे.

कुमार विश्वास म्हणाले, मी दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या लोकांच्या बैठकीवर आक्षेप घेतल्यानंतर मला पंजाबमधील बैठकीतून काढून टाकले. त्यानंतर मी अशा प्रकारची एक बैठक रंगेहात पकडली असा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे. त्यांनी यावेळी म्हटले की, बैठक सुरू असलेल्या ठिकाणी हरयाणातील सुरक्षारक्षक पहारा देत होता. त्यावेळी मी आत जाण्यास निघालो असताना त्या सुरक्षा रक्षकाने मला अडवले व आत बैठक सुरू असल्याचे सांगितले. त्यावेळी मी सुरक्षा रक्षकाला धक्का देऊन आत गेलो असता तेथे दहशतवादी समर्थक लोकांशी केजरीवाल यांची बैठक सुरू होती. त्यावेळी मी विचारल्यानंतर इसका बडा फायदा होगा असे केजरीवाल यांनी म्हटले होते असा दावा कुमार विश्वास यांनी केला.

कुमार विश्वास यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या आरोपांची चौकशी करावी असे मत व्यक्त केले.मात्र केजरीवाल म्हणाले की, कुमार विश्वास यांनी केलेले आरोप हास्यास्पद आहेत.

पंजाबमध्ये मतदानाला काही तास शिल्लक असताना अशा प्रकारे गंभीर आरोप झाल्याने पंजाबमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Updated : 19 Feb 2022 5:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top