Home > News Update > कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार, भारताच्या लढ्याला यश

कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार, भारताच्या लढ्याला यश

कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार, भारताच्या लढ्याला यश
X

कुलभूषण जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सिस (अपिल) देण्याचा निर्णय पाकिस्तान ने घेतला आहे. पाकिस्तानच्या संसदेने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (ICJ) निर्णयानुसार कुलभूषण जाधव यांना अपील करण्यासंदर्भात असलेल्या विधेयकाला मंजूरी दिली आहे. त्यामुळं कुलभूषण जाधव यांना आता काऊन्सेलर अॅक्सिस मिळाला आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती.

त्यानंतर पाकिस्तान लष्कराच्या या निर्णयाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर अॅक्सेस नाकारले म्हणून अपिल केले होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दोन्ही देशाची बाजू ऐकल्यानंतर कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. हा निकाल भारताच्या बाजूने लागला होता. आयसीजेने कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून भारतावर लावण्यात आलेल्या आरोपांना योग्य मानलेले नाही. २ वर्षे आणि दोन महिने आससीजेमध्ये १५ सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती.

खंडपीठाने निकालात म्हटले होते की, पाकिस्तानकडून जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सिस देण्यात आला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानने जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा अशी सूचना आयसीजेने केली आहे. या शिक्षेचा पुनर्विचार होत नाही. तोपर्यंत त्यांना दिलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले होते.

Updated : 17 Nov 2021 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top