Home > News Update > 'व्यर्थ न जाये ये बलिदान' अभियानांतर्गत ऑगस्ट क्रांती दिनी क्रांती ज्योत पदयात्रा संपन्न

'व्यर्थ न जाये ये बलिदान' अभियानांतर्गत ऑगस्ट क्रांती दिनी क्रांती ज्योत पदयात्रा संपन्न

‘व्यर्थ न जाये ये बलिदान’ अभियानांतर्गत वर्धा येथे ऑगस्ट क्रांती दिनी क्रांती ज्योत पदयात्रा संपन्न झाली. यावेळी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या शहीदांना श्रध्दाजंली वाहण्यात आली.

व्यर्थ न जाये ये बलिदान अभियानांतर्गत  ऑगस्ट क्रांती दिनी क्रांती ज्योत पदयात्रा संपन्न
X

वर्धा : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर "भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास" उजागर करण्यासाठी तसेच "स्वातंत्र्य भारताच्या विकासात काँग्रेसची भूमिका" किती महत्त्वाची होती आणि आहे, हे विशद करण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा येथे क्रांती ज्योत पदयात्रा काढण्यात आली.

ही क्रांती ज्योत पदयात्रा शिवाजी चौक ते बडे चौक, इंगोले चौक , सोशालिस्ट चौक, बजाज चौक मार्गे काढण्यात आली. स्वतंत्र संग्राम आंदोलनातील वर्धा जिल्ह्यातील प्रथम शहीद "जंगलुजी ढोरे" यांचा स्मृतीस्तंभाला मानवंदना देऊन क्रांती ज्योत पदयात्रेचा समारोप करण्यात आला. त्यानंतर "हुतात्मा स्मारक" डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे "क्रांती दिना" निमित्त स्वातंत्र्य लढ्यातील शहिदवीरांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज चांदूरकर, इंटकच्या पदाधिकारी अर्चना भोमले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Updated : 10 Aug 2021 6:37 AM GMT
Next Story
Share it
Top