Home > News Update > गावठी पिस्तुलजवळ बाळगणारा आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात

गावठी पिस्तुलजवळ बाळगणारा आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात

गावठी पिस्तुलजवळ बाळगणारा आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात
X

अहमदनगर : गावठी पिस्तुलजवळ बाळगणारा आरोपीला अहमदनगरच्या कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भुषण रजणीकांत निकम (एमआयडीसी अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि. संपत शिंदे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे, पोना बंडु भागवत, पोना नितीन गाडगे, पोना शाहिद शेख,पोकॉ सुमीत गवळी,पोकॉ प्रमोद लहारे, पोकॉ अभय कदम, पोकॉ सुशिल वाघेला यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार रात्री ११.३० वा चे सुमारास एकजण हा त्याच्याजवळील मोटर सायकलवर एक व्यक्ती गावठी पिस्तुलासह अहमदनगर शहरात केडगाव भागात फिरत आहे, या माहीतीच्या आधारे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी तात्काळ पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान या पथकाने अहमदनगर शहरातील केडगाव भागात कारमेल शाळेजवळ एका संशयीत इसमास सापळा रचून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आपले नाव भूषण रजणीकांत निकम असे सांगितले. पंचासमक्ष आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी बनावटिचे पिस्टल, दोन जिवंत राउंड तसेच त्यांची बजाज ई एक्स डी मोटार सायकल असा एकूण ४५ हजार २०० रु किंमतीचा मुददेमाला मिळून आला. पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. IT ७१७/२०२१ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

Updated : 30 Sep 2021 3:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top