Home > News Update > कोरेगाव भीमा : संभाजी भिडेंची बाजू घेतल्याचा आरोप, जयंत पाटलांचं उत्तर

कोरेगाव भीमा : संभाजी भिडेंची बाजू घेतल्याचा आरोप, जयंत पाटलांचं उत्तर

कोरेगाव भीमा : संभाजी भिडेंची बाजू घेतल्याचा आरोप, जयंत पाटलांचं उत्तर
X

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आरेच्या आंदोलनातील, तसंच नाणार प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दिले आहेत.

त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी कोरेगाव भीमा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

हे ही वाचा

अजित पवारांनी भाजपला का साथ दिली? स्वत: शरद पवारांनी दिलं उत्तर

पी चिदंबरम यांना जामीन, ‘या’ अटीवर केला जामीन मंजूर

मुंबईत किती आदिवासी राहतात, हे तुम्हाला माहिती आहे का?

आज कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांना कोरेगाव भीमा प्रकरणात प्रश्न विचारले असता...

त्यांनी “आमचं सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. कोणते गुन्हे गंभीर आहेत, कोणत्या गुन्ह्यामध्ये जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना गुंतवले गेले. याची माहिती घेतली जाईल. सगळ्याच गोष्टींचा विचार करून निर्णय घेतले जातील.’’

तसंच यावेळी त्यांनी हुसेन दलवाई यांनी लावलेल्या आरोपाला उत्तर दिले. हुसेन दलवाई यांनी सांगलीत दंगल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी संभाजी भिडे यांची बाजू घेतली होती असा आरोप केला होता. या आरोपावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे

‘अजून खातेवाटपाबाबतचा निर्णय झाला नाही. त्यामुळे मी कुणाला पाठिशी घालतोय असा प्रश्नच उद्भवत नाही. गुन्हे आहेत त्यांना सरकार धडा शिकवेल. गैरसमज पसरवू नये. सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचे आहेत’.

असं म्हणत या प्रकरणात काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिले.

Updated : 4 Dec 2019 4:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top