Home > News Update > कोकणातील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीची मदत

कोकणातील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीची मदत

अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा कोकणाला मोठा फटका बसला आहे. अशा पुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जीवनावश्यक वस्तूंच्या पाच ट्रक पाठवण्यात आल्या आहेत.

कोकणातील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीची मदत
X

अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे कोकणाची पुरती दाणादाण उडाली आहे. कोकणी माणसांचे संसार उद्ध्वस्त झालेत. या उद्ध्वस्त संसारांना सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे पाच ट्रक कोकणाच्या दिशेने रवाना केलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या ट्रकला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे उपस्थित होते.

कोकणात गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे कोकणातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी कोकणाला पुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

जीवनावश्यक वस्तूंचे पाच ट्रक रवाना

या पूरग्रस्तांना साह्य करण्याची संकल्पना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. त्यानुसार , शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बिस्किटचे पुडे, पाण्याच्या बाटल्या, फिनायल, खाद्यपदार्थ , मेणबत्ती, काडीपेट बॉक्स या साहित्याचे पाच ट्रकमध्ये भरून कोकणाच्या दिशेने रवाना केलेत. हे साहित्य थेट पूरग्रस्तांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ट्रकसोबत गेले आहेत.

Updated : 25 July 2021 1:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top