कडकनाथ कोंबडी घोटाळा: एका शेतकऱ्याची आत्महत्या

हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झालेल्या कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याचा आणखी बळी कोल्हापूर जिल्ह्यात गेलाय. या घोटाळ्यात फसवणूक झालेल्या प्रमोद जमदाडे यांनी आज आत्महत्या केलीये. ते पन्हाळा तालुक्यातील माले या गावचे रहिवासी होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आपले पैसे परत मिळवण्यासाठी संघर्ष करत होते.

मोठा परतावा मिळेल या आशेनं त्यांनी महारयत एग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायात पाच लाखांची गुंतवणूक केली. पण हा घोटाळा उघड झाल्यापासून ते नैराश्यात होते आणि २ दिवसांपूर्वी त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कोल्हापुरातल्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.