Home > News Update > बंड्या तात्या कराडकर यांच वादग्रस्त वक्तव्य

बंड्या तात्या कराडकर यांच वादग्रस्त वक्तव्य

सुपरमार्केट आणि किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मत्रीमंडळाने घेतला. त्यानंतर या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रीया नोंदवल्या गेल्या. मात्र त्यातच जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

बंड्या तात्या कराडकर यांच वादग्रस्त वक्तव्य
X

सुपरमार्केट आणि किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मत्रीमंडळाने घेतला. त्यानंतर या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रीया नोंदवल्या गेल्या. मात्र त्यातच जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत किराणामाल आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला . त्यावरून जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात दंडवत दंडूका आंदोलन छेडले. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत किराणामालाच्या दुकानात आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. तर या निर्णयामुळे वाईन उद्योग आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होईल, असा दावा निर्णय घेताना करण्यात आला. त्यामुळे या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद रंगला. सरकारच्या निर्णयाला अनेक संघटनांनी विरोध केला. तर जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करत सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

यावेळी बोलताना बंडातात्या म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या काही मुठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेऊन वाईन विकण्याचा निर्णय लादलेला आहे."विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचं आंदोलन करता आलं नसतं. बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. तसंच सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात, असे उल्लेख केला. तर पुढे, कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा, असा सवालही यावेळी केला.

बंडातात्या पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे, असे म्हणत अजित पवार यांना टोला लगावला.

Updated : 3 Feb 2022 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top