Home > News Update > 'दुनिया की सैर करलो, पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला' ; किरीट सोमय्या यांचा अजित पवारांवर निशाणा

'दुनिया की सैर करलो, पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला' ; किरीट सोमय्या यांचा अजित पवारांवर निशाणा

दुनिया की सैर करलो, पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला ; किरीट सोमय्या यांचा अजित पवारांवर निशाणा
X

साखर कारखान्यांवर पडणाऱ्या धाडींवरून निर्माण झालेल्या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उत्तरं दिली. कारखान्यांची विक्री आणि खरेदीची लिस्टच त्यांनी सादर केली. मात्र, त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी पीआर एजन्सीने दिलेली यादी वाचून दाखवलेली दिसते, असा चिमटा काढतानाच दुनिया की सैर करलो, पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला आहे, असं सोमय्या यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांनी त्यांच्या कंपन्या आणि त्यातील गुंतवणुकीवर चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या बहिणींच्या आर्थिक व्यवहारावरही चिंता व्यक्त केली होती. मात्र, बिल्डरबरोबरांच्या संबंधावर त्यांनी काहीच भाष्य केलं नाही, स्पार्कलिंक बाबतही बोलणं टाळलं आहे,जरंडेश्वर मिल प्रायव्हेट लिमिटेडच्या विक्रीतून 2009 मध्ये 50 कोटी मिळाले होते. या सर्वांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. गुरु कमोडिला कारखाना कसा दिला? कमोडिटीजला कारखाना चालवण्याचा गंधही नव्हता. तरीही त्यांना कारखाना कसा विकला? असा सवाल सोमय्यांनी केला आहे.

अजित पवार यांनी सत्तेचा दुरुपयोग केला असा घणाघात करताना, अजितदादांनी मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी, मी सादर केलेली कागदपत्रे चुकीची आहेत असं म्हणावं पण त्यांच्यात हिंमत नाही. अपारदर्शकता, सत्तेचा दुरुपयोग स्पष्ट दिसतो. त्यामुळे चौकशी तर होणारच असं सोमय्यांनी म्हटले आहे.

Updated : 22 Oct 2021 1:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top