Home > News Update > अपहरण केलेल्या भारतीयांना तालीबानने सोडलं?

अपहरण केलेल्या भारतीयांना तालीबानने सोडलं?

अपहरण केलेल्या भारतीयांना तालीबानने सोडलं?
X

अफगाणिस्तान मध्ये तालिबानने सत्ता स्थापन केली आणि संपुर्ण जगाला घक्का बसला. इतर देशांप्रमाणे भारताने देखील अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, शनिवारी दुपारी जवळपास १५० नागरिकांचं तालिबाननं अपहरण केल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिलं. एएनआयच्या या वृत्तानंतर काही वेळातच तालिबानी प्रवक्ता अहमदुल्लाह वसिकने, "आम्ही त्या १५० नागरिकांचं अपहरण केलं नसून त्या सगळ्यांना विमानतळाजवळच्या एका गॅरेजमध्ये ठेवलं आहे," असा दावा केला आहे.

"अनेक अफगाणी वृत्तांनुसार, काबुलमधून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांचे तालिबान्यांनी अपहरण केले. त्यामध्ये भारतीय नागरिकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. याची अधिकृत माहीती नाही, परंतू अधिक तपशिल येणे अपेक्षित आहे." असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले होते. यानंतर भारतात एकच गदारोळ माजला होता. यानंतर अफगाणी माध्यम काबुल नाउचे पत्रकार झाकी दर्याबी (Zaki Daryabi) यांनी, " तालीबान प्रवक्ता अहमदुल्लाह वसिक ने १५० भारतीयांचे वृत्त नाकारले." असे ट्विट केले.

यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा अफगाणी माध्यम काबुल नाउचे पत्रकार झाकी दर्याबी (Zaki Daryabi) यांनी यासंदर्भातले ट्विट केले. ज्यात, "सर्व भारतीय सुरक्षित आहेत. अपहरणकर्त्यांनी लोकांचे पासपोर्ट गोळा केले आणि त्यांची तपासणी केली. असे एका सूत्राने सांगितले. अपहरणकर्त्यांनी सुत्रांना सांगितले की सगळे परत काबुल विमानतळाकडे जातील. आता ते काबुल विमानतळाजवळील एका गॅरेजमध्ये आहेत." असे म्हटले आहे.

यानंतर पुन्हा एकदा काबुल नाउचे पत्रकार झाकी दर्याबी (Zaki Daryabi) यांनी महत्तवाचे ट्विट केले. ज्यात, "दोन स्त्रोतांनी मला तालीबानद्वारे प्रसिद्ध केलेल्या भारतीयांची बातमी दिली. ते काबुल विमानतळाच्या दिशेने मार्गस्थ आहेत.", असे म्हटले आहे.

Updated : 21 Aug 2021 9:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top