एकनाथ खडसेंच यादीत नाव

गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांच्या यादीत नाव न आल्यानं खडसे अस्वस्थ आहेत. खडसेंनी यासाठी दबाव तंत्राचा देखील वापर केला आहे. मात्र, तरीही खडसेंना अद्यापपर्यत पक्षाने उमेदवारी दिलेली नाही.
या सर्वांमध्ये आणखी महत्वाची यादी असते ती म्हणजे स्टार प्रचारकांची. भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या यादीत एकनाथ खडसे यांचे नाव भाजपचे स्टार प्रचारकांच्या यादी मध्ये आहे. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसे यांना अद्यापपर्य़त विधानसभेची उमेदवारी मिळाली नसली तरीही खडसे यांचे नाव भाजपच्या स्टार प्रचारकाच्या यादीत आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य़ांच्यासह 40 नेत्यांची नाव आहेत.