खडसे राज्यसभेवर? देवेंद्र फडणवीसांना झटका?

Khadse, Devendra Fadnavis, news, marathi, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहेत. तसे संकेत भाजपातील सूत्रांनी दिले आहेत.सध्या भाजपच्या कार्यकारिणीवर आणि भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांवर एकनाथ खडसे नाराज आहेत. विधानसभेच्या वेळी जाणीवपूर्वक तिकीट नाकारल्याचा आरोप त्यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक आपल्या विरोधात पक्षाकडे भूमिका मांडण्याचं मत त्यांनी जाहीररीत्या व्यक्त केलं होतं.

राज्यात गेलेली भाजपची सत्ता आणि त्यात भाजपचा झालेला प्रभाव यामुळे एकनाथ खडसे यांचं वक्तव्य दिल्लीतील भाजपा नेत्यांनी गांभीर्यपूर्वक घेतलं आहे. एकनाथ खडसे हे येत्या काळात भाजपाला डोकेदुखी ठरू शकतात, असा अंदाज भाजपने त्यांना आल्यामुळेच खडसे यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. खडसे दिल्लीत गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांचा रस्ता मोकळा होईल असा दावाही भाजपच्या सुत्रांकडून करण्यात आलेला आहे. पण खडसे यांना राज्यसभेवर पाठवल्यामुळे पक्षात खडसे गट पुन्हा सक्रिय होईल असं म्हटलं जातंय.

राज्यसभेच्या जागांसाठी जी नावं भाजपकडून निश्चित करण्यात आली आहेत त्यात एकनाथ खडसे यांचं नाव असल्याचं सूत्रांकडून समजतं. तिकडे पंकजा मुंडे या ही पक्षातील कारभारावर नाराज आहेत. पंकजा मुंडे यांना विधान परिषद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. याबाबतचा अंतिम निर्णय २ दिवसात होणार असल्याची माहिती मिळते.