Home > News Update > #BigBreaking केतकी चितळेची १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

#BigBreaking केतकी चितळेची १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

#BigBreaking केतकी चितळेची १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
X

आपण राजकीय व्यक्ती नसून मला समाज माध्यमांवर माझे स्वत:चे मत मांडायचा अधिकार नाही का? कोणताही वकील न घेता न्यायालयात स्वत:च युक्तिवाद केला. या हे सर्व ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर केतकी चितळेचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळे हिला रविवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

त्यामुळे आता पोलीस कोठडीतील चौकशीत काय समोर येणार याकडे लक्ष लागले. केतकी चितळे हिने कोणताही वकील घेतला नव्हता. तिने न्यायालयात स्वत:च युक्तिवाद केला. यावेळी तिने आपण राजकीय व्यक्ती नसल्याचे सांगितले. मला समाज माध्यमांवर माझे स्वत:चे मत मांडायचा अधिकार नाही का, असा सवालही तिने विचारला. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली. यानंतर केतकी चितळेचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.

केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. ठाणे सत्र न्यायालयाबाहेरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतकी चितळे हिच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता आम्ही केतकी चितळेला महाराष्ट्र दर्शन घडवू, असा इशाराही दिला. केतकी चितळे हिच्यावर राज्यात ९ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केतकी चितळे हिच्यावर इतर शहरांमधील गुन्ह्यांप्रकरणीही कारवाई होणार आहे.

केतकी चितळे कोर्टात काय म्हणाली?

ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल केतकी चितळेने उपस्थित केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, अशी ठाम भूमिकाही केतकीने घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १८ मे रोजी होईल.

केतकी चितळेवर नऊ ठिकाणी गुन्हे दाखल

केतकी चितळे हिच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत एकूण नऊ ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात केतकी चितळेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Updated : 15 May 2022 7:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top