Home > News Update > कलम ३७० : पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडले

कलम ३७० : पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडले

कलम ३७० : पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडले
X

संसदेने जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचना विधेयकाला मंजूरी देण्याबरोबरचच कलम 370 मधील काही अनुच्छेद रद्द करण्याच्या निर्णयाला मंजूरी दिल्यानंतर पाकिस्तानने भारताशी असलेले राजकीय सबंध 'डाउनग्रेड' म्हणजे कमी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर भारत आणि पाकिस्तान दोनही बाजूचा व्यापार बंद करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. भारताच्या संसदेने हे विधेयक पास केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने काश्मीरसंबंधी विशेष बैठक घेऊन आम्ही काश्मीरसाठी कोणत्याही स्तरावर जाऊ अशी धमकी दिली होती. त्यानंतर आज पाकिस्तानने हा निर्णय घेतला.

भारताने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या निर्णयाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आव्हान देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पाकिस्तानी लष्कराला नियंत्रण रेषेवर सर्तक राहण्याचे आदेश इम्रान खान यांनी दिली आहेत.

Updated : 7 Aug 2019 2:18 PM GMT
Next Story
Share it
Top