Home > News Update > कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीत मतदानाची तारीख बदलली

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीत मतदानाची तारीख बदलली

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र निवडणूक आयोगाने तारखेत बदल केला आहे.

कसबा  आणि चिंचवड पोटनिवडणूकीत मतदानाची तारीख बदलली
X

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखेत बदल करून नवी तारीख जाहीर केली आहे.

कसा आहे निवडणूक कार्यक्रम : (election program)

पुणे (Pune) जिल्ह्यातील कसबा (Kasaba) आणि चिंचवड (chinchwad) विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने (Election commission of india) निडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 31 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. तर 7 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाणणी होऊन 10 फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. याबरोबरच या पोटनिवडणूकीसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र 27 फेब्रुवारी रोजी सोमवार असल्याने निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. यानुसार 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

Updated : 2023-01-25T11:16:42+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top