Home > News Update > धनंजय मुंडेंनी अनेक बायका लपवल्या, करूणा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा

धनंजय मुंडेंनी अनेक बायका लपवल्या, करूणा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा

वर्षभरापासून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करूणा मुंडे यांच्यातील वाद राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच करूणा मुंडे यांनी कोल्हापुर विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापार्श्वभुमीवर धनंजय मुंडे यांनी अनेक बायका लपवल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

धनंजय मुंडेंनी अनेक बायका लपवल्या, करूणा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा
X

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करूणा मुंडे या पती-पत्नीमधील वाद सर्वश्रुत आहे. त्यापार्श्वभुमीवर करुणा मुंडे यांनी पक्ष स्थापन करून धनंजय मुंडे यांच्याविरोधात प्रचार सुरू केला आहे. त्यातच पंढरपूर येथे बोलत असताना धनंजय मुंडे यांना पाच-सहा आपत्ये असतानाही मंत्रीपदावर कसे? असा सवाल केला होता. मात्र त्यापाठोपाठ कोल्हापुर येथे बोलताना निवडणूक अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांनी अनेक बायका लपवल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

करूणा मुंडे म्हणाल्या माझ्याकड़े लपवण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे मी निवडणूक शपथपत्रात सगळी खरी माहिती भरणार आहे. तसेच माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत. त्यामुळे अर्ज भरताना मला कोणतीही अडचण येणार नाही, असे करूणा मुंडे यांनी सांगितले.

पुढे बोलताना करूणा मुंडे म्हणाल्या की, मला जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा आहे. महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणासह कोल्हापुर मधील घराणेशाही संपवण्यासाठी माझा लढा आहे, असे करूणा मुंडे यांनी सांगितले. याबरोबरच करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रेमकहाणी चित्रपटाच्या माध्यमातून समोर येईल, असे करुणा मुंडे यांनी सांगितले.

Updated : 24 March 2022 7:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top