Home > News Update > आणखी एका मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

आणखी एका मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

आणखी एका मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
X

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी उघड झाले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यात आले आहे. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. येडियुरप्पा यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे, “मला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट आला आहे. माझी प्रकृती व्यवस्थित असून खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये एडमिट झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी” असे आवाहन येडियुरप्पा यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनादेखील याआधी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावरही सध्या उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या भाजपच्या नेत्यांची संख्या सध्या वाढलेली आहे.

Updated : 3 Aug 2020 1:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top