Home > News Update > #HijabRow : कर्नाटक हायकोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष

#HijabRow : कर्नाटक हायकोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष

#HijabRow : कर्नाटक हायकोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष
X

कर्नाटकमधील कॉलेजमध्ये हिजाबला बंदी घालण्यात आल्यानंतर देशातील वातावरण तापले आहे. याच हिजाबच्या वादात सोमवारी हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये हिजाबवर बंदी घालण्यात आल्यानंतर हा वाद सुरू झाला. मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब बंदीला विरोध केल्यानंतर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी भगवे पंचे घालून शाळा-कॉलेजेसमध्ये प्रवेश केला. यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या दरम्यान हे प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर कोर्टाने राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक संस्थांमध्ये सध्या धार्मिक वस्त्र परिधान करुन येण्यास मनाई केली आहे.

काही मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब बंदीला हायकोर्टात आव्हान दिले आहे. यावरील सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्यातील शाळा सुरू करण्याचे आदेश दिले, त्याचबरोबर शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात धार्मिक वस्त्र परिधान करण्यास मनाई केली आहे. यानंतर कर्नाटकमधील बहुतांश शाळा आज सुरू झाल्या आहेत. तर कॉलेजेस १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे हायकोर्टातील सोमवारच्या सुनावणीमध्ये काय होते त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Updated : 14 Feb 2022 5:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top