Home > News Update > कराळे मास्तर सरकारविरोधात रस्त्यावर बेरोजगार तरूणांचं भजे विकून आंदोलन

कराळे मास्तर सरकारविरोधात रस्त्यावर बेरोजगार तरूणांचं भजे विकून आंदोलन

कराळे मास्तर सरकारविरोधात रस्त्यावर बेरोजगार तरूणांचं भजे विकून आंदोलन
X

गेल्या काही दिवसांपासून वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर युवकांचे आंदोलन सुरू आहे. सरकारी नोकऱ्यांच कंत्राटी पद्धतीने भरती करण्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे. अनेक युवकांनी यावेळी अनोख आंदोलन केलं आहे तर. फिनिक्स अकॅडमीचे नितेश कराळे मास्तरही या सरकारविरोधात आता रस्त्यावर उतरले आहेत.

दरम्यान गांधी जयंतीनिमित्त अनेक तरुणांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्टॉल लावत बेरोजगार पकोडेवाला, मोदी चायवाला अस नाव देत स्टॉल उभारले आहेत तर त्या स्टॉलला राजकीय नेत्यांचे चित्र लावण्यात आले आहेत.

यावेळी कराळे मास्तर म्हणाले की "या बेरोजगारी वाढत असल्याने बेरोजगार पकोडेवाला, मोदी चायवाला स्टॉल लावावे लागत आहे. हे आंदोलन सहा दिवसांपासून सुरू आहे. कंत्राटी नोकर भरतीचा जीआर मागे घेण्याची मागणी कराळे मास्तर यांनी केली आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की " ६२ हजार शाळा सरकार अदानी-अंबानीला दत्तक देणार असल्याचा आरोप देखील कराळे मास्तर यांनी केला आहे.



Updated : 1 Oct 2023 4:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top