Home > News Update > दलित युवकाला जात विचारुन मारहाण, प्रायव्हेट पार्टवर काठीने मारहाण

दलित युवकाला जात विचारुन मारहाण, प्रायव्हेट पार्टवर काठीने मारहाण

दलित युवकाला जात विचारुन मारहाण, प्रायव्हेट पार्टवर काठीने मारहाण
X

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये एका दलित मुलाला मारहाण करत असतानाच धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ कानपूर देहात (Kanpur Dehat) मधील असून या व्हिडिओमध्ये दलित मुलाला जात विचारत मारहाण केल्याचा प्रकार दिसून येतो. दरम्यान दलित मुलाने आपली जात सांगितली असता, त्याला बेदम मारहाण केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

आरोपी व्यक्तींनी युवकाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर सुद्धा काठीने मारहाण केली. दरम्यान जखमी अवस्थेत या तरूणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे. कानपूर मधील या अमानुष घटनेने लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, कानपूर मधील ग्रामीण भागात घडलेल्या या प्रकरणातील पीडित युवक हा दलित मजूर असल्याचं समजतंय. तसेच या व्हिडिओमध्ये सुद्धा हे स्पष्ट दिसत आहे की, आरोपींनी दलित तरूणाला त्याची जात विचारल्यानंतर त्याच्यावर हल्ला करत मारहाण केली. या पीडित युवकाला आरोपींनी लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. हा अमानुष प्रकार होत असतांना पीडित युवक वेदनांनी ओरडताना असल्याचं सुद्धा व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वीची असून अकबर पूर पोलिस स्टेशन परिसरातील आगूकमालपूर गावची आहे.
दरम्यान प्रेम प्रकरणामुळे दलित युवकाला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे. तर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात NDTV ने वृत्त दिलं आहे. "व्हायरल व्हिडिओ विषयी माहिती मिळताच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून व्हिडिओमधील मारहाण करत असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर व्हिडिओमध्ये आणखी २ व्यक्ती दलित मुलाला मारहाण करतांना दिसत आहेत. मात्र, त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी पोलिसांची टीम एक टीम तयार केली असून पीडित युवकाला कानपूरच्या हैलट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Updated : 11 July 2021 7:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top