Home > News Update > भारतात ट्विटरवर बंदी येणार? कंगनाच्या ट्विटमुळे चर्चा

भारतात ट्विटरवर बंदी येणार? कंगनाच्या ट्विटमुळे चर्चा

भारतात ट्विटरवर बंदी येणार? कंगनाच्या ट्विटमुळे चर्चा
X

गेल्या काही दिवसात महाराष्ट्र सरकार आणि इतरांविरोधात ट्विटरच्या माध्यमातून टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानावतने आता ट्विटरविरोधात मोर्चा उघडला आहे. ट्विटर हिंदूफोबिक म्हणजेच हिंदूविरोधक आणि देशविरोधी व्यासपीठ असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. विशेष म्हणजे तिने ट्विट करत हा आरोप केला आहे. ट्विटरवर भारतात बंदीची मागणीही कंगनाने केली आहे.

कंगनीने तिचा वडिलांसोबतचा फोटो ट्विट करत ट्विटरवर बंदीची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसात ट्विटरने केंद्रशासित प्रदेश असलेला लेहचा भाग जम्मू-काश्मीरच्या नकाशात दाखवल्यानंतर सरकारने ट्विटरला नोटीस बजावली आहे. तर नुकतेच ट्विटरने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केले होते. या सर्व प्रकरणानंतर कंगनाने ट्विटरवर हल्ला केला आहे. एरवी आपल्या छोट्या छोट्या गोष्टी ट्विटरवर शेअर करणाऱ्या कंगनाने गेल्या काही दिवसात सुशांत सिंह प्रकरणातून महाराष्ट्र सरकार आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटींवर टीका केली होती. त्याच ट्विटरवर कंगनाने आता कारवाईची मागणी केली आहे.


Updated : 14 Nov 2020 9:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top